Bhiwandi : झोपडपट्टीतील मुलांची शिकवण, भिवंडीतील शिक्षक इकबाल अन्सारी यांनी उभारली शिक्षणाची भिंत
अनिल वर्मा; एबीपी माझा, भिवंडी | 19 Jul 2021 08:20 PM (IST)

कोरोना काळात मागील दीड वर्ष सर्व जनजीवन विस्कळीत झाले असताना विद्यार्थ्यांच्या शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात यानिमित्त करण्यात आली. शहरी भागात यात जागी प्रमाणात यश मिळाले असले तरी ग्रामीण भागासह शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात राहणारे लाखो विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणा पासून वंचित असून त्यासाठी भिवंडी पालिका शिक्षण मंडळातील शिक्षक इकबाल अन्सारी यांनी चक्क मोहल्ल्यात एक भिंतीवर शालेय अभ्यासाचे चार्ट लावून शिक्षणाची भिंत उभारली आहे.