SC Result on Shinde Government Special Report : सगळं चुकलं, पण सरकार वाचलं ABP Majha
abp majha web team | 11 May 2023 09:33 PM (IST)
SC Result on Shinde Government Special Report : सगळं चुकलं, पण सरकार वाचलं ABP Majha
सत्तासंघर्षाच्या संपूर्ण निकालात सर्वोच्य न्यायालयाच्या घटनापीठाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढलेत. महाविकास आघाडीचं सरकार ते शिंदेंचं सरकार, चर्चेत राहिले ते फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. राज्यपाल कोश्यारी विरुद्ध मविआ सरकार हा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आणि बंडानंतरचीही राज्यपालांची भूमिका चर्चेत राहिली. याच मुद्द्यावरुन आज सुप्रीम कोर्टाने राज्यपालांवर ताशेरे ओढले.