Special Report : Yavatmal Water Story : हंडाभर पाणी, संघर्षाची कहाणी! विहिरीत पाणी भरण्यासाठी कसरत
Special Report : Yavatmal Water Story : हंडाभर पाणी, संघर्षाची कहाणी! विहिरीत पाणी भरण्यासाठी कसरत
हंडाभर पाण्यासाठी जीव गमावलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वेदिका चव्हाणची दुर्दैवी कहाणी एबीपी माझानं समोर आणली...मात्र, यवतमाळमधल्या त्या पंचक्रोशीत पाण्यासाठी जीव गमावणारी वेदिका एकटी नाही...यवतमाळ जिल्ह्यातल्या पारधी पाड्यावर महिला आणि मुली कोणता धोका पत्करून रोज हंडाभर पाणी भरत आहेत, हे दृश्य तुम्ही पाहा...अंगावर काटा येईल...मेट्रो, बुलेट ट्रेनची भाषा करणारा हाच तो औद्योगिक महाराष्ट्र आहे का, असा प्रश्नही तुम्हाला पडेल...पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट..
हा जीवघेणा संघर्ष सुरु आहे जगण्यासाठीचा...
तीव्र उतार असलेल्या अत्यंत धोकादायक विहिरीत
एका बाजूनं उतरत असलेली ही महिला
पाण्याची एक गुंडी भरते...
तिच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेला ती देते
मग दुसरी तिसरीला ही गुंडी सोपवते...
एकमेकांच्या सहकार्यातून एक गुंडी पाणी अशा प्रकारे विहिरीच्या बाहेर येतं...
यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी वस्तीवरच्या महिला
रोज अशाच पद्धतीनं जीव धोक्यात घालून
एक एक गुंडी पाण्यासाठी वणवण करतायत