Special Report : Raj Thackeray And Uddhav Thackeray Relation : राज ठाकरे उद्धव ठाकरेंपासून का दुरावले?
Special Report : Raj Thackeray And Uddhav Thackeray Relation : राज ठाकरे उद्धव ठाकरेंपासून का दुरावले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यात गेल्या दोन दशकांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय...एकमेकांच्या सोबत वाढलेल्या दोन भावांच्या वाटा आता बऱ्याच वेगळ्या झाल्यात...राजकीय कटुता अनेकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आलीय...तरीही दोघा भावांनी एकत्र यावं अशीच अनेकांची भावना आजसुद्धा आहे...पण हे शक्य आहे का?...भूतकाळात त्यांचे संबंध नेमके कसे होते आणि भविष्यात काय, पाहुयात, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
एकेकाळी मातोश्रीच्या अंगणात खेळलेल्या, बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाटा दोन दशकापूर्वी वेगळ्या झाल्या...
बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंकडे आलं....त्यानंतर राज ठाकरेंनी वेगळी वाट धरली...
विठ्ठलाबद्दल तक्रार नाही मात्र भोवतीच्या बडव्यांबद्दल आहे असं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला.