Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकून हद्दपार झालेला तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कोणतेही हस्तक्षेप न करता कोल्हापूर उच्च न्यायालयाला राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने सांगितले की हे प्रकरण कोल्हापूर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. मात्र, यावेळी उच्च न्यायालयाकडून कोरटकरला जे नियम देण्यात आले होते ते वाचून दाखवण्यात आले. दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी कोरटकर प्रकरणावर सांगितले की जामीन रद्द करावा ही मागणी होती. कोल्हापूर न्यायालयामध्ये हा एकतर्फी निर्णय झाला. आता कोरटकर हा मुंबईत आला आहे हे सर्वांना माहित आहे, तरी त्याला अटक करत नाही याचं नेमकं कारण काय? राजकीय सरंक्षण आहे का? अशी विचारणा असीस सरोदे यांनी केली. आज उच्च न्यायालयाने सांगितले आहे की कोणत्याही दबावाखाली येऊ नका. कोल्हापूरच्या कोर्टात प्रश्न एवढच आहे की त्याचा जामीन रद्द करायला हवा, असे ते म्हणाले.