Special Report | एक व्हॅलेंटाईन डे असाही; बैलाचे प्राण वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावली जीवाची बाजी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली : बैल धूत असताना रस्त्यावरन जाणाऱ्या एका वाहनाला पाहून बैलाने उडी मारल्याने बैल जॅकवेलमध्ये जाऊन पडला आणि बैल बुडू लागला. यावेळी शेतकऱ्याने थेट जॅकवेलमध्ये उडी मारली आणि बैल बुडू नये म्हणून बैलाची वेसण धरत बैलाचे तोंड वरती धरले. तब्बल अडीच तास शेतकरी बैलाची वेसण धरून जॅकवेलमध्ये पोहत होता. शेवटी जेसीबीच्या मदतीने बैलास बाहेर काढण्यात आले. हा सगळा प्रकार घडलाय सांगलीच्या शिराळा तालुक्यातील काळामवाडी गावामध्ये.
काळामवाडी येथील सखाराम पाटील आपल्या मुलासह बैलांना घेऊन गावच्या जॅकवेलजवळ धुण्यासाठी घेऊन गेले होते. बैल धूत असताना रस्त्यावरील जाणाऱ्या एका वाहनाला घाबरुन बैलाने उडी मारल्याने बैल जॅकवेलमध्ये पडला. जॅकवेलला पायऱ्या नसल्याने आणि पाणी खोल असल्याने बैलास बाहेर काढणे अवघड झाले होते. बैल बुडू लागला. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी सखाराम यांचे चिरंजीव रुपेश पाटील यांनी जॅकवेलमध्ये उडी मारून बैलांसह पोहत त्याने बैलाची वेसण धरत बैलाचे तोंड वरती धरले.
दोघेही अशाच परिस्थितीत अडीच तास पाण्यात पोहत राहिलेत. अडीच तासानंतर जेसीबी आणून बैलास सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे ग्रामस्थ व पाटील कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला. बैल जॅकवेल मध्ये पडल्याची घटना समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.