Assembly Elections 2021 | 'त्या' पाच राज्यात आचारसंहिता लागू | Special Report
एबीपी माझा वेब टीम | 26 Feb 2021 11:12 PM (IST)
नवी दिल्ली : आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.