Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत
राज्यात वर्षभरापुर्वी महायुतीने दणदणीत यश मिळवत सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ झाला. या वर्षभरात महाविकास आघाडीला सर्वच पातळीवर गळती लागली. मविआतील तिन्ही प्रमुख पक्ष काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना आऊटगोईंगने त्रस्त झालेयत
महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले आणि हरलेले उमेदवारही महायुतीच्या गोटात सामील झालेयत. महाविकास आघाडीची आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे अशी ही पळवापळवीच्या तीन अंकी नाटकाचा धडाकेबाज प्रयोग... ऐकून डोक्याचा भुगा होईल... पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतील... पण हे आहे आजच्या लोकशाहीचं खराखुरं वास्तव... खोबरं तिकडं चांगभलं म्हण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सुरू असलेला आटापिटा... विधानसभेत सुपडासाफ झालेल्या मविआचा तंबू सोडण्यासाठी धडपड... आणि सत्तेच्या उबेला जाण्यासाठीची तडफड... विधानसभेत दुसऱ्या क्रमाकांची मते घेणाऱ्या तब्बल ४३ जणांनी मविआला रामराम ठोकत महायुतीचा झेंडा हाती घेतलाय... त्यातही अनेकांनी पहिली पसंती भाजपलाच दिल्याचं समोर आलंय...