Special Report Harshada Kamble : सोशल मीडियावर हर्षदा कांबळेची हवा, अवतरली सुंदरा गाजली चंद्रा
abp majha web team | 21 Mar 2023 11:52 PM (IST)
हर्षदा हरेश कांबळे... हे तेच नाव आहे, ज्याचा डंका महाराष्ट्रासह देशभर वाजतोय. या चिमुकलीच्या नृत्याचं कौतुक अनेकजण करतायत. कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागात ती राहते. जिथं मोबाईला नीट रेंज नाही, जिथं एसटी जात नाही, इतकंच काय तर, जिल्हापरिषद शाळेत जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा सगळ्या वातावरणाशी सामना करणाऱ्या हर्षदाचं नृत्य आणि त्याचे व्हिडीओ व्हायरल होतायत. याच धूळमाखल्या वाटेवर चालणाऱ्या हर्षदाच्या पायांच्या ठेक्याने खुद्द अमृता खानविलकरलाही भुरळ पडलीय. चंद्रा या गाण्यावर हर्षदाने केलेलं नृत्य पाहून अमृताने तिचं तोंड भरून कौतुक केलंय.