Special Report Fake Insurance Scam : 'बोगस विम्याचं पीक' पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Fake Insurance Scam : 'बोगस विम्याचं पीक' पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेती
राज्य शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या खरीप हंगामात राज्यात लाखो शेतकऱ्यांनी विमा उतरवला. मात्र नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात बोगस पीक विमा उतरवल्याचं समोर आलंय. कृषी विभागानं तब्बल ५ हजार शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा बोगस पीक विमा उतरवल्याची माहिती दिली आहे. ही बाब खरंच धक्कादायक आहे. एबीपी माझानं यासंदर्भात थेट शेतकऱ्यांच्या 'त्या' प्लॉटवर जाऊन पडताळणी केली. या पडताळणीत नेमकं काय समोर आलं? पाहूयात माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट....
राज्यात बोगस विम्याचं 'पीक?'
पंतप्रधान पीक विमा योजनेचे बोगस लाभार्थी?
पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेती
२७ गुंठ्याचे २७ हेक्टर कसे झाले?
कृषी विभागाच्या पडताळणीत काय आढळलं?
पाच हजार शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचा बोगस विमा