Soyabean Crop Special Report : सोयाबीनवर यलो मोझॅकचं संकट, 60 ते 70 टक्के पिक वाया; शेतकरी चिंतेत
abp majha web team | 15 Oct 2023 12:59 PM (IST)
आधी पावसाची पाठ... नंतर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस... यामुळे महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झालंय. ऐन पावसाळ्य़ात जमिनी कोरड्याठाक आणि शेती रिकामी पडली होती... मात्र म्हणतात ना... आशा माणसाला शांत बसू देत नाही... याच आशेनं अनेक शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेत सोयाबीनची लागवड केली... पाण्याची कशीबशी तजवीबज करत पिकं जगवली... आणि आता त्यातून दोन पैसे पदरात पडतील म्हणून शेतकरी आनंदला... मात्र आधीच दुष्काळ आणि त्यात यलो मोझॅक रोगाचा तेरावा महिना आला... त्यामुळे सोयाबीन उत्पादक पुरते हवालदिल झाले आहेत... पाहूयात...