Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
कधीतरी आपल्याला सांगायचं एक असतं आणि समोरचा त्याचा वेगळाच अर्थ लावतो... तुमच्या बाबतीत असं होतं का? कधीतरी झालंच असेल... त्यावेळी तुम्हाला जसं फिलिंग आलं असेल, काहीसं तसंच आज नारायण राणेंचं झालं... काल एका जाहीर सभेत त्यांच्या एका वाक्याचा वेगळाच अर्थ घेतला गेला आणि दिवसभर त्याचीच चर्चा रंगली... नेमकं काय घडलं तुम्ही स्वतःच बघा...
भाजप खासदार नारायण राणेंच्या तोंडून ही दोन वाक्यं बाहेर पडली आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली.
अर्थात ही दोन वाक्यं जितकी महत्त्वाची होती, तितकीच महत्त्वाची होती या दोन वाक्यांआधीची चार वाक्यं आणि नंतरची चार वाक्यं.
रिटायरमेंटच्या मूडमध्ये आलेला माणूस हा त्याच्या आयुष्यात लक्षात राहिलेल्या किश्श्यांची उजळणी करताना आपण अनेकदा पाहतो.
नारायण राणेंनीही असेच थरारक किस्से सांगून सर्वांनाच आ वासायला भाग पाडलं.