TAUKTAE : फक्त पंचनामे नको, वेळेत मदत द्या,'निसर्गा'तून सावरतानाच तोक्तेचं संकट,सिंधुदुर्गकर हवालदिल
विजय केसरकर, एबीपी माझा | 18 May 2021 10:49 PM (IST)
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग किल्यालाही बसला. किल्यावर जाणारा विद्युत पुरवठा खंडित असून किल्यावरील रहिवाशांना दोन दिवसांपासून अंधारात रहावं लागत आहे. सिंधुदुर्ग किल्याच्या प्रवेशद्वारावरील काही भाग वादळाच्या तडाख्यात उचकटून गेला आहे. तसेच तोक्ते चक्रीवादळामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटाही किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्यात येत होत्या.