Shivraj Thorat : अहमदनगरच्या 16 वर्षीय शिवराजची विश्वविक्रमाकडे कूच, 24 तासात 450 किमी सायकलिंग
नितीन ओझा, एबीपी माझा | 02 Jul 2021 09:37 PM (IST)
शिर्डी : सलग 24 तास सायकल चालवत संगमनेर ते इंदोर प्रवास करत 16 वर्षीय शिवराज थोरात याने विश्वविक्रम मोडीत काढला आहे. याआधी 24 तासात 16 वर्ष आतील असलेला 430 किमीचा विश्वविक्रम शिवराजने मोडीत काढला असून 28 जूनला आपल्या क्रू सदस्यांच्या मदतीने त्याने हा प्रवास दिवस रात्र प्रवास करत पूर्ण केलाय. लवकरच याची गिनीज रेकॉर्ड बुकमध्ये नोंद होणार असून शिवराजच्या या विश्वविक्रमाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे.