Sharad Pawar : पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2021 10:16 PM (IST)
बारामती : महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद कुणाकडे द्यायचं यावरुन महाविकास आघाडीतील पक्षांसह राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा तीन पक्षाचा निर्णय स्पष्ट झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं ते म्हणाले.