Shahjibapu patil Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report
शहाजीबापू... सांगोल्याचे शहाजीबापू ओळखले जातात ते त्यांच्या काय झाडी काय डोंगार या डायलॉगसाठी... मात्र याच शहाजीबापूंना आता विरोधक काय झाडी आणि काय धाडी असा डायलॉग मारत डिवचू लागलेत... आणि त्यामागचं कारण म्हणजे रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं केलेली छापेमारी...भाजपविरोधात सतत बोलले म्हणून शहाजीबापूंवर छापे पडले असं शिवसेनेला वाटतंय.. तर सगळ्यात पक्षाच्या नेत्यांवर छापेमारी झाली असं उत्तर भाजपकडून देण्यात येतंय.. असो.. सध्या सांगोल्याचा किल्ला लढवताना शहाजीबापू एकटे पडलेत एवढं नक्की...
काय झाडी... काय डोंगार... काय हाटील... या डायलॉगमुळे चांदा ते बांदा फेमस झालेल्या शहाजी बापू पाटलांची सध्याची अवस्था काय आहे , हे सांगण्यासाठी त्यांचा हा डायलॉग पुरेसा आहे...
हल्ली डोळ्यात पटकन पाणी उभं राहतं...
डरकाळी फोडण्याची भीती वाटते की नाही हे ठोस माहीत नाही, पण डरकाळीची इच्छा होत नाही एवढं मात्र नक्की...
असं असलं तरी झुकेगा नही साला हा पुष्पाचा अॅटीट्यूड अजून शाबूत आहे...
आपण स्वतः झुकणार नसलो तरी ज्यांना झुकवायचंय, त्याचा थंड डोक्यानं त्यांनी विचार सुरू केलाय..
आणि शहाजी बापूंवर विचार करण्याची ही वेळ ओढवलीय, ती रविवारी रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यामुळे...
रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी सांगोल्यासाठी तो हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याचा ठरला..रविवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली...आपण आजारी असताना भाजपनं निवडणुकीत एकटं का पाडलं? असा सवाल विचारणाऱ्या शहाजीबापूंबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र फडणवीसांनी शहाजीबापू पाटलांबद्दल ब्र काढला नाही. त्यानंतर रात्री शहाजीबापू पाटलांची सभा झाली. गर्दी जमवण्यात शहाजीबापू देखील चांगलेच यशस्वी झाले
सभा संपताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं सांगोल्यात एन्ट्री घेतली..
खरं तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शहाजीबापू पाटलांबरोबरच, भाजप आणि शेकापच्या कार्यालयावर देखील छापे टाकले...
मात्र राजकारणात चर्चा सुरूय ती फक्त आणि फक्त शहाजीबापूंचीच...
आता या छापेमारीसाठी शहाजीबापूंनी दोन जणांकडे बोट वळवलंय
एक म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवणारे मात्र सध्या पक्षात जास्त सक्रिय नसणारे दीपक साळुंखे..
आणि दुसरे म्हणजे भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
शहाजीबापूंचे आरोप म्हणजे दीपक साळुंखे आणि शेकापला निव्वळ नाटक वाटतंय.
शहाजी बापूंची ही नाटक कंपनी आहे .. त्यांना निवडणुकीत असा कांगावा करायची सवय आहे .. पण आता त्यांनी लक्षात ठेवावे त्यांच्या कपाळाला गुलाल सोडा माती सुद्धा लागणार नाही ..
निवडणूक काळा छापेमारी ही प्रशासनाची कारवाई असते यात सत्ताधारी आणि विरोधक असा विषयच नसतो ..
या छापीमारीत ना पालकमंत्र्याचा संबंध आहे ना माझा ना दीपक साळुंखेचा .. आम्ही छापेमारी केली असती तर आमच्या कार्यालयावर कसे छापे पडले)
शहाजीबापू भाजपवर निशाणा साधत असल्यामुळे त्यांच्यावर छापेमारी झालीय का असा प्रश्न आता शिंदेंची शिवसेना विचारू लागलीय
शहाजीबापूंवरच्या छापेमारीचा विषय शिंदेसाहेब सिरियसली घेतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला...
मात्र या छापेमारीत एकनाथ शिंदेंना सिरियसली घेण्यासारखं काही वाटत नाहीय
शहाजीबापूंवरच्या छापेमारीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सिरियली उत्तर दिलंय
शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये सवाल जवाब सुरू असताना, ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी शहाजी बापूंना टोला लगावण्यासाठी ऊस बाहेर काढला..
गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले.
आता भाजप विरुद्ध ब्र काढला की छाप्याची मालिका सुरू झाली.
खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे.
'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू!