Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणप्रेमी हिंदूविरोधी असल्याचा ठपका नितेश राणेंनी ठेवला...खरं तर तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचं अप्रत्यक्ष नेतृत्व करताहेत अभिनेते सयाजी शिंदे... फक्त तपोवनच नाही, तर राज्यभरात सयाजी शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत.. सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारे सयाजी शिंदे, पर्यावरण क्षेत्रातले हिरो कसे आहेत? पाहुयात या रिपोर्टमधून
सयाजी शिंदेंनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांसोबतच विविधांगी व्यक्तिरेखांची ही
यादी वाढतीच आहे. रुपेरी पडद्यावर व्हिलन साकारणारे सयाजी शिंदे तपोवनातील
झाडांच्या रक्षणासाठी हीरो ठरलेत.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारणीची तयारी सुरु
झालीय. ज्याकरता १८०० झाडांची वृक्षतोड करण्यात येणार आहे. सरकारच्या या
निर्णयाला सरकारमधीलच एक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सयाजी
शिंदे यांनी कडाडून विरोध केलाय.