Sanjay Raut Tweet : संजय राऊतांचा 'तो' व्हिडीओ वादात, संभाजीराजेंकडून कानउघडणी Special Report
abp majha web team | 19 Dec 2022 10:13 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप आणि मग सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर प्रत्यारोप किंवा सत्ताधाऱ्यांचा विरोधकांवर आरोप आणि मग विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर प्रत्यारोप हा खेळ आता नेहमीचा झालाय. पण महाराष्ट्राच्या राजकारणातला हा खेळ आता भलत्याच वळणावर पोहोचलाय. कारण टीका झाली म्हणून झटपट प्रत्युत्तर देण्याच्या हव्यासापायी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जे केलं, त्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.