Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
विजय वडेट्टीवर यांनी चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांना जबरदस्तीने उचलून नेले असा गंभीर आरोप प्रतिभा धनोरकर यांनी केला आहे. खरंतर विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडणून आल्यानंतर सत्तास्थापनेचा प्रयत्न करायचा होता, मात्र त्यांनी गटबाजी सुरु करायला नको होते. त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावे यासाठी आम्ही त्यांना हॉटेलला हलवले आहे.चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्याला आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात ढवळाढवळ करू असा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.आमची मागणी पक्षाने मान्य केली नाही , पक्षाला आमची गरज नसेल तर मग आम्ही सामूहिक राजीनामा देऊ अशी भूमिका प्रतिभा धानोरकर यांनी घेतली.