MNS vs Congress vs Raut : मनसे, काँग्रेस आरामात; राऊत मात्र जोमात Special Report
abp majha web team | 13 Oct 2025 10:06 PM (IST)
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महाविकास आघाडीत (MVA) काँग्रेसला (Congress) सोबत घेण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. राऊत म्हणाले, 'स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे'. राऊत यांच्या या दाव्यानंतर मनसे आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या पक्षाची भूमिका केवळ आमचे पक्षश्रेष्ठीच ठरवतील, असे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींनंतर संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांना मेसेज पाठवून आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिल्याचे समजते. इतकेच नाही तर, राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार गटाप्रमाणेच काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात, असा टोलाही लगावला आहे.