Sanjay Raut On Ajit Pawar Special Report : राजकीय 'पिकदाणी' धरणात बुडवा!
abp majha web team | 03 Jun 2023 11:40 PM (IST)
काल दिवसभर पत्रकार परिषदेत संजय राऊत जाहीरपणे थुंकल्यावरून आता राजकीय आरोपांच्या पिचकाऱ्या जोरात पडू लागल्यायत. सर्व स्तरातून इतकी टीका होऊनही, संजय राऊत मात्र आपल्या थुंकण्याचं समर्थन करत, अजब-गजब विधानं करतायत. आणि हे करताना त्यांनी स्वत:ची तुलना थेट सावरकरांशी केलीय. आणि हे कमी की काय म्हणून, विरोध दर्शवण्यासाठी थुंकणं ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याची मखलाशीही त्यांनी केलीय..