Sangli Mini Gypsy : तीन मुलींच्या शिक्षणासाठी अपंग बापानं बनवली मिनी जिप्सी
कुलदीप माने, एबीपी माझा | 22 Dec 2021 10:00 PM (IST)
Sangli : कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकी साहित्याच्या पार्टचे जुगाड करत छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडीची बांधणी केलीय. शिवाय हीच चारचाकी सध्या गावातील रस्त्यावर, हायवेवर देखील सुसाटपणे धावतेय. त्यामुळे ही चारचाकी गाडी सध्या सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलीय.