परवानगी न घेता कार्यालयाची तपासणी? पत्रकाराला मारहाण,दानवेंच्या कार्यालयाची झाडाझडती,काय आहे प्रकरण?
रवी मुंडे, एबीपी माझा | 15 Jun 2021 08:55 PM (IST)
जालना : जालन्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय झाडाझडती केल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई केली.