Rajan Salvi Special Report : राजन साळवी यांच्याकडे 18 टक्के अधिक संपत्ती? ACB चौकशीत काय घडलं?
abp majha web team | 18 Jan 2024 11:33 PM (IST)
रत्नागिरी: अटकेच्या कारवाईला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे असं सांगत मी शरण जात नाही म्हणून सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केला. या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे असं सांगत आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर गुन्हा दाखल केला ते ठिक आहे, पण यामध्ये माझी पत्नी आणि मुलालाही ओढलं जात आहे हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीने आज साडे सहा तास चौकशी केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी सुरू आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.