PV Sindhu Victory: दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला,पीव्ही सिंधूचं कारकीर्दीत दुसरं ऑलिम्पिक पदक
संदीप चव्हाण | 01 Aug 2021 11:14 PM (IST)
PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सिंधूने रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा पराभव करुन ही कामगिरी केली. सिंधू ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे पदक आहे.