Pune Metro Fashion Show Special Report : पुण्यातली मेट्रोमध्ये थेट फॅशन शो, पुणे मेट्रोचं आयोजन
abp majha web team | 11 Mar 2023 11:14 PM (IST)
कधी इथे ढोल ताशांचा नाद घुमतो. कधी इथे कवीसंमेलन भरतात. कधी इथे फुगड्या घातल्या जातात. कधी इथे लावणीच्या तालावर नायिका ठुमकतात तर कधी इथे थेट फॅशन शोच रंगतो... हे कुठलं सभागृह नाहीय. ही आहे पुण्यातली मेट्रो मुंबईत मेट्रोत मुंगी शिरायलाही जागा नसताना पुणे मेट्रो मात्र पुणेकरांसाठी सध्या जॉय राईड बनलेय. पाहूया स्पेशल रिपोर्ट