Pune Leopard : नरभक्षक बिबट्या ठार, पण दहशत संपणार कधी? Special Report
abp majha web team | 05 Nov 2025 10:38 PM (IST)
पुण्यातील शिरूर (Shirur), खेड (Khed) सह चार तालुक्यांमध्ये पसरलेली बिबट्याची दहशत अखेर काही प्रमाणात कमी झाली असून, तीन जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला (Man-eater Leopard) वनविभागाने ठार केले आहे. एका तज्ज्ञांच्या मते, ‘ऊसाच्या क्षेत्रमध्ये बिबट्यासाठी अत्यंत पूरक असं वातावरण आहे...त्यामुळे या ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढत आहे.’ शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय रोहन बोंबेसह (Rohan Bombe) एका वृद्ध महिलेचा आणि एका लहान मुलाचा जीव घेणाऱ्या या बिबट्याला ठार करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याचदरम्यान, शिरूरमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे, तर खेड तालुक्यात एक बिबट्या मांजराचा पाठलाग करत थेट घराच्या अंगणात पोहोचल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या तालुक्यांमध्ये अंदाजे १२०० हून अधिक बिबटे असल्याने, हा मनुष्य-प्राणी संघर्ष (Human-Wildlife Conflict) रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.