Political Shakeup : 'चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार' - जयकुमार गोरे
abp majha web team | 17 Oct 2025 10:14 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 'चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार' असल्याची माहिती दिली आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे आणि अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने, तसेच माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत आणि विक्रम शिंदे यांचीही भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली. या राजकीय घडामोडींमुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते.