Nimbalkar War : रणजितसिंहांचा दुग्धाभिषेक,रामराजेंना मिरच्या; संगीत भाऊबंधकीचा प्रयोग Special Report
abp majha web team | 04 Nov 2025 10:10 PM (IST)
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय युद्ध पेटले आहे. 'माझ्या सकट सर्वांची नार्को टेस्ट (Narco Test) करा, दोषी आढळल्यास तुरुंगात जायला तयार आहे', असे थेट आव्हान रणजितसिंह निंबाळकर यांनी दिले आहे. रणजितसिंह यांनी सर्व आरोपांमागे रामराजे 'मास्टरमाइंड' असल्याचा दावा केला, तर रामराजेंनी हे आरोप फेटाळून लावत, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. रणजितसिंह यांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक घालून त्यांचे समर्थन केले, तर दुसरीकडे रामराजेंनी जिल्ह्यातील २७७ प्रकरणांची SIT चौकशी करण्याची मागणी हायकोर्टात करणार असल्याचे म्हटले आहे. या कौटुंबिक आणि राजकीय संघर्षात ऑडिओ क्लिप्स आणि जुन्या प्रकरणांवरून एकमेकांवर चिखलफेक सुरू झाल्याने फलटणमधील वातावरण तापले आहे.