Pandharpur Vitthal Mandir :माऊलींच्या मंदिरात हिंदी विरुद्ध मराठी वाद,नेमकं काय घडलं? Special Report
abp majha web team | 11 Aug 2025 11:22 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेविरोधात आंदोलनं सुरू होती. आता हा भाषेचा वाद थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पोहोचला आहे. ९ ऑगस्ट रोजी झालेल्या सामूहिक तुळशी अर्चन पूजेदरम्यान हिंदीतून पूजा सांगितल्याचा आरोप नाशिकच्या राहुल सातपुते या भाविकानं केला आहे. या तक्रारीनंतर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंदिर समितीनं या आरोपांची दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, "पूजा कुठलीही हिंदीत होत नाही पूजा ह्या सर्व सर्व संस्कृत श्लोक आहेत. संस्कृत मधूनच पूजा होते त्यामुळे पूजा कुठल्याही प्रकारे हिंदीत झालेली नाही." या प्रकरणात मनसेनंही उडी घेतली असून, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पुजाऱ्यांच्या आडून हिंदी अजेंडा कोण राबवतंय, असा सवाल केला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.