Oil Leakage : पालघरजवळ 80,000 लिटर डिझेलचा साठा असलेलं जहाज आदळलं, पालघरमधून ग्राऊंड रिपोर्ट
मृत्यूंजय सिंह, एबीपी माझा Updated at: 29 May 2021 09:51 PM (IST)
तौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतर ही याच ठिकाणी आहे . मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे.