Nitin Gadkari Threat Special Report : गडकरी धमकी धक्कादायक गौप्यस्फोट, आरोपी जयेशनं धर्मांतर केलं!
abp majha web team | 07 Apr 2023 10:02 PM (IST)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जयेश पुजारीने धर्म परिवर्तन केले असून त्यानंतर त्याचे नाव शाकीर असल्याची माहिती मिळतेय. तसंच, चौकशीच्या वेळेला जेव्हा केव्हा पोलीस त्याचा जयेश असा नाव उच्चारतात तो कुठलेही सहकार्य करत नाही. माझं नाव शाकीर आहे, मला शाकीर म्हणूनच हाक मारा असं तोे म्हणतो... १४ जानेवारी रोजी त्यानं धमकीचा पहिला कॉल केल्यावर फोन नष्ट केला होता.. मात्र लगेचच त्याच्या हातात नवा फोन आला असंही नागपूर पोलिसातील सूत्रांनी सांगितलं. बेळगावच्या जेलमध्ये त्याला नवनवे मोबाईल फोनसह अनेक सोयी मिळत होत्या.. या सोयींचा खर्च करणारा कुणीतरी मोठी व्यक्ती आहे, असा पोलिसांना संशय आहे.