Sangram Jagtap : राष्ट्रवादीच्या विचारसरणीविरोधी जगतापांची भूमिका? नोटीसीनंतर बदलणार की कायम ठेवणार?
abp majha web team | 12 Oct 2025 08:50 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे पक्षात वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना नोटीस बजावली आहे, तर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट हकालपट्टीची मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी, 'आपली खरेदी आणि आपल्याकडे जो लाभ घटेल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे,' असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. पक्षाची विचारधारा 'शिव-शाहू-फुले-आंबेडकरी' विचारांची असताना जगताप यांनी MIM नेत्यांना 'बोकुड' संबोधण्यासारखी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याने अजित पवार यांनी कारवाईचा बडगा उगारला. मात्र, नुसती नोटीस देऊन चालणार नाही, संविधानाविरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला पक्षातून काढून टाका, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दुसरीकडे, भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी 'मी संग्राम भैय्यांच्या सोबत आहे' म्हणत जगतापांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे, ज्यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.