Nashik Bulldozer Action : नाशिकमध्ये 'योगी पॅटर्न', गुन्हेगाराच्या अड्ड्यावर बुलडोझर Special Report
abp majha web team | 16 Oct 2025 10:14 PM (IST)
नाशिकमध्ये (Nashik) RPI आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या (Prakash Londhe) अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. 'लोंढेच्या आशीर्वादानं परिसरात अनधिकृत वस्ती उभी राहिली, तेव्हा मनपाचे अधिकारी कुठे होते?' असा प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित केला जात आहे. सातपूर गोळीबार (Satpur Firing Case) प्रकरणात अटकेत असलेल्या प्रकाश लोंढेच्या नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेल्या दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईसाठी पोलिसांकडून महापालिकेला विनंती करण्यात आली होती. कारवाई झालेल्या एका इमारतीत काही दिवसांपूर्वी पोलिसांना एक भुयार सापडले होते, ज्याचा उपयोग गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर झालेल्या या कारवाईमुळे महापालिकेच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण ही बांधकामे होत असताना प्रशासनाने दुर्लक्ष का केले, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या कारवाईवर सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच ताशेरे ओढले आहेत.