Nashik Brahmagiri : अवैध खोदकाम, अनधिकृत बांधकामं करून ब्रह्मगिरीला पोखरणारे 'उंदीर' कोण? ABP Majha
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा | 29 Jul 2021 10:47 PM (IST)
वर्षानुवर्ष ऊन- पाऊस, वादळ-वाऱ्यासाह इतर आव्हानांचा सामना करत आणि या संकटापासून त्र्यंबकंनगरीचे सरक्षण करणारा ब्रह्महगिरी पर्वत अनेक एतिहासिक पौराणिक घटनांचा साक्षीदार आहे. त्यामुळे हा इतिहासलाच धक्का मनाला जात आहे. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच पर्वतावरून उगम पावते. सह्याद्री पर्वत रांगेतील ब्रह्महगिरी हा महत्वाचा पर्वत म्हणून ओळखला जात असल्यान पर्वतराज असे संबोधिले जाते. मात्र या पर्वताच्या अस्तित्वालाच आता हानी पोचवली जात असून निसर्गिक साधन संपत्ती, पर्यावरण, जैव विविधतेला धोका निर्माण झाला आहे.