MVA Morcha Meeting : मोर्चासाठी एकी, बैठकीत बेकी? विरोधकांचं प्लॅनिंग Special Report
abp majha web team | 30 Oct 2025 10:30 PM (IST)
बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) पुकारलेला मोर्चा आणि त्यामुळे तापलेलं राजकारण हा चर्चेचा विषय ठरला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे, त्यामुळेच हिंदू जिमखान्याऐवजी फॅशन स्ट्रीटहून मोर्चा काढत आहेत', असा थेट हल्लाबोल भाजपने केला आहे. येत्या १ नोव्हेंबरला मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा निघणार असून, त्यात महाविकास आघाडीसह मनसेचे नेते सहभागी होणार आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या संभाव्य एन्ट्रीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे वरिष्ठ नेते बैठकांना अनुपस्थित राहिले आहेत. दुसरीकडे, उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे राज ठाकरे आघाडीत आल्यास आम्ही सोबत राहणार नाही, असा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे.