MVA on Mumbai Seat Special Report : मुंबईतील मतदारसंघावरुन मविआत रस्सीखेच ?
abp majha web team | 08 Jan 2024 11:39 PM (IST)
भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटलेत.. पण तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये.. त्याला कारण ठरतंय ते जागावाटप.. मुंबईतील मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जातोय. याच दाव्यांवरुन आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगू लागलीये.. पण या चर्चांना काही तासातच फूलस्टॉप लागले.. कारण उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणारेय.. ज्यात अर्थातच जागावाटपावर चर्चा होईल.. पण हा जागावाटपाचा तिढा सोडवताना वरीष्ठांना घाम फुटणार हे नक्की.