Fake Adhar Card | बांगलादेशी घुसखोरांना आमदारांचं पाठबळ? मालेगावातील दलालांकडून कागदपत्रं जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2020 06:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचं बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्यांना स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटर हेडचा वापर करण्यात आला आहे. साकीनाका परिसरातून दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा मोबाईल तपासला असता ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे पुरावे मिळाले.