Saamana And Dainik Bharat Special Report : दोन्ही मुखपत्रांमधून कलंकवादावर तोंडसुख, राज्याचं राजकारण
abp majha web team | 12 Jul 2023 09:27 PM (IST)
कलंक... कलंक आणि कलंक... हे शब्द गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या कानात घुमतायत... उद्धव ठाकरेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आणि आरोप-प्रत्यारोपांनी सगळं राजकीय वातावरण डागाळून गेलं... आता या वादाचा सूर मुखपत्रांमध्येही आळवला गेलाय. एक संघाचं मुखपत्र असलेलं तरुण भारत आणि दुसरं ठाकरेंचं मुखपत्र असलेलं सामना... दोन्ही मुखपत्रांमधून कलंकवादावर तोंडसुख घेण्यात आलंय...