Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
नक्षली कमांडर, सुरक्षा दलाच्या जवानांच्या जीवावर उठलेल्या एका क्रूरकर्म्याला सुरक्षा यंत्रणांनी यमसदनी धाडलंय. कोण होता हा खतरनाक नक्षली....काय होते त्याचे मनसुबे? त्याच्या खात्म्यानंतर राज्यातल्या नक्षली कारवायांवर कसा होईल परिणाम जाणून घेऊया.
माडवी हिडमा.... डोक्यावर सहा कोटींचं बक्षीस असलेला कुख्यात आणि क्रूर दहशतवादी... हत्या.... अपहरण... हिंसक कारवाया यामुळे नक्षलग्रस्त राज्यात माडवी हिडमाची प्रचंड मोठी दहशत होती... पण सुरक्षा दलानं अखेर ही दहशत संपवली... एन्काऊंटर हिडमाचा खात्मा झालाय...
माडवी हिडमा... अगदी सामान्य आणि सडपातळ दिसणारा छत्तीसगडमधला एक आदिवासी तरुण... छत्तीसगडच्या अत्यंत मागास अशा पुवर्ती गावातून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिडमा नक्षलवाद्यांसोबत गेला आणि मग बनला नक्षलवाद्यांचा सर्वात क्रूर आणि जंगलातील सशस्त्र लढ्यात, तसेच गनिमीकावा करत सुरक्षा दलांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवणारा नक्षली कमांडर त्यानं अनेक वर्ष नक्षलवाद्यांच्या "बटालियन वन"चं यशस्वीरित्या नेतृत्व केलं मिड पीटीसी - रजत वशिष्ठ, प्रतिनिधी नक्षली चळवळीचे अभ्यासक प्रा. अरविंद सोहनी माडवी हिडमाबाबत काय म्हणालेयत तेही ऐकूयात...