Mahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीच्या जागावाटपाची मोठी लगबग सुरू झालीय... त्यासाठी बैठकांचा जोरही वाढलाय... भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांमध्ये जागांसाठी वाटाघाटी सुरू आहेत... मात्र महायुतीच्या घटकपक्षांचं काय? त्यांना चर्चेत घेतलं जाणार आहे की नाही? आणि त्यांना किती जागा मिळणार? याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात...
महायुतीत सध्या जागावाटपाची मोठी
लगबग सुरूय... शिंदेंची शिवसेना
आणि अजित पवारांची राष्ट्रवादी... या
दोन्ही भिडूंनी जास्तीत जास्त जागा
पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडे
फिल्डिंग लावलीय... तिन्ही मोठ्या पक्षांचा
आवाज मोठा असणारच, पण त्यात छोट्या
पक्षांचे आवाज मात्र महायुती ऐकणार का?
हा खरा प्रश्नय... या छोट्या पक्षांचे मतदार
तुलनेने कमी असले तरी, राज्यातल्या प्रत्येक
मतदारसंघात ते विखुरलेले आहेत... त्यामुळे
प्रत्येक जागेवर त्यांच्या कार्यकर्त्यांची मेहनत
कामाला येत असते... आता हे छोटे पक्षही
विधानसभेसाठी तयारी करतायत...म्हणूनच
त्यांनीही महायुतीकडे जागांची मागणी
केलीय...
घटकपक्षांची जागांसाठी विनवणी
महादेव जानकरांच्या
राष्ट्रीय समाज पक्षांची ४०
जागांची मागणी (फोटो- महादेव जानकर)
कवाडेंच्या पीपल्स
रिपब्लिकन पक्षांची
१५ जागांची मागणी (फोटो- जोगेंद्र कवाडे)
आठवलेंच्या रिपाइंची
१२ जागांची
मागणी (फोटो- रामदास आठवले)
विनय कोरेंच्या जनसुराज्य
पक्षाची १२ ते १५ जागांची
मागणी (फोटो- विनय कोरे)