Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुतीत वाढलेला तणाव कुठवर जाणार, याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरूय. त्यात भर घातलीये भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी. काल त्यांनी युतीबाबत एकच वाक्य उच्चारलं अन् त्याची बातमी झाली. आज पुन्हा एकदा त्यांनी आपलं ते विधान कायम ठेवत सस्पेन्स वाढवलाय.
कल्याण-डोंबिवलीनंतर कोकणातही महायुतीतीत संबंध ताणले गेलेत...
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांना विचारायला गेलेल्या माध्यमांना त्यांनी हे असं उत्तर दिलं...
आता चव्हाणांनी युतीबाबत इतका सस्पेन्स क्रिएक केल्यावर याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणं क्रमप्राप्त होतंच...
शिंदेंनी अशी सामोपचाराची भाषा केल्यानंतरही चव्हाणांनी काही माघार घेतली नाही. जे काही होईल ते २ तारखेलाच, असं ते पुन्हा म्हणाले.
निवडणुकांपूर्वी होत असलेल्या फोडाफोडीमुळे भाजप आणि शिवसेनेतला तणाव कमालीचा टोकाला गेलाय. त्यातच आता खुद्द रविंद्र चव्हाण काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत सातत्यानं देत आहेत. त्यामुळे २ डिसेंबरला महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.