Maharashtra Road Potholes Special Report : रस्त्यांवर खड्डयांची माळ, मुंबई जाम ABP Majha
abp majha web team | 25 Jul 2023 11:54 PM (IST)
Maharashtra Road Potholes Special Report : रस्त्यांवर खड्डयांची माळ, मुंबई जाम ABP Majha
तुम्ही टॅक्स भरता का?, तुम्ही गाडी घेताना पैसे मोजता का?, तुम्ही डिझेल-पेट्रोलसाठी पैसे देता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हो अशीच आहेत. मात्र पुढच्या प्रश्नाचं उत्तरही हो असंच आहे, पण ते संतापजनक आणि मनस्ताप देणारं आहे. आणि तो प्रश्न आहे. गाडी चालवताना तुम्हाला खड्ड्यांमुळे दणके बसतात का? खरंतर, खड्ड्यांमुळे प्रवास इतका त्रासदायक आणि जीवघेणा झालाय की, खड्ड्यांमुळे खराब होण्यापेक्षा गाड्या आता विकायच्या का? असा प्रश्न आता कुणी विचारला तर, त्याचं आश्चर्य वाटणार नाही. पाहूयात. खड्ड्यांमुळे लोकांच्या प्रवासात कसा संकटांचा खड्डा पडलाय.