Lockdown जिल्हाबंदीचा विचार नाही, Weekend Lockdown Night Curfew बाबत चर्चा!
abp majha web team | 06 Jan 2022 08:28 PM (IST)
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वेगानं वाढत असली तरी लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच तूर्तास तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.