Kolhapur Leopard : कोल्हापूरच्या वस्तीत बिबट्याचा थरार, ३ तास श्वास रोखले! Special Report
abp majha web team | 11 Nov 2025 11:42 PM (IST)
कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्क परिसरात मंगळवारी सकाळी एका पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याने प्रवेश केल्याने मोठी दहशत निर्माण झाली. या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वनरक्षक, पोलीस कर्मचारी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांसह एकूण चार जण जखमी झाले. वनविभाग, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद केले, त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी सांगितले की, 'बिबट्याने बहुधा पंचगंगा नदीकाठी असलेल्या झाडाझुडपाच्या भागातून शहरात प्रवेश केला का याचा शोध घेतला जात आहे'. पुणे आणि नाशिकप्रमाणेच कोल्हापुरातही मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.