कोळशाच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, औष्णिक विद्युत प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जेचा पर्याय
अभिषेक मुठाळ | 20 Jun 2021 08:45 PM (IST)
कोळशावरील मोठे औष्णिक वीज प्रकल्पातील जुने युनिट खर्चिक होत आहेत. आपण सध्या वीज निर्मितीत सरप्लस आहे. हे जुने उर्जा प्रकल्प बंद केल्यास आणि इतर अपारंपरिक उर्जेवर जर आपण वीज निर्मिती केल्यास महाराष्ट्राचे पुढच्या दशकभरात 75 हजार कोटी वाचणार आहे. त्याचबरोबर वसुंधरेचा होणारा ऱ्हास थांबवून ग्लोबल वॉर्मिंगवर मात करणे शक्य होणार आहे.