Lalbauge Crowd Special Report : लालबाग राजाच्या नियोजनात कोण कमी पडतंय?
abp majha web team | 26 Sep 2023 12:03 AM (IST)
नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती लाभलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईठाण्यासह देशभरातून लाखो भाविक येत असतात. पण गणपतीबाप्पाचं दर्शन घ्यायचं, तर रात्रभर रांगेत उभं राहायचं हे ओघानं आलंच. पण रात्रभर लावलेली ती रांग कासवाच्या गतीनं पुढे सरकते. त्यामुळं भाविकांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड संयम बाळगावा लागतो. पण बाप्पाची मूर्ती दिसली की पाया पडण्याआधीच त्या भाविकाला पुढे ढकलणं सुरु होतं. त्याच सुमारास लालबागच्या राजा मंडपात एखादा व्हीआयपी आला की सर्वसामान्य भाविकांच्या हालांना पारावार उरत नाही. त्यामुळंच प्रश्न विचारण्यात येतोय की व्हीआयपीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचं नियोजन बिघडतंय का? त्यामुळंच धक्काबुक्कीच्या घटना घडतायत का? पाहूयात या प्रश्नांची उत्तरं शोधणारा रिपोर्ट.