महापुरात पडझड झालेल्या कोल्हापूरच्या शाळेला नवी झळाळी, भारत गॅस फ्लड रिलिफ फंडच्या सदस्यांचा पुढाकार
विजय केसरकर, एबीपी माझा | 22 Apr 2021 10:28 PM (IST)
कोरोना संकटातील एक सकारात्मक बातमी कोल्हापुरातून, लॉकडाऊनचा आपण सकारात्मक उपयोग केला तर या घडू शकतं याचं उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात घडलंय. महापुरामुळे मुलींची एक शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पण गेले वर्षभर या शाळेची पुनर्बांधणी सुरु होती. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने ही शाळा पुन्हा उभारण्यासाठी संधीचा उत्तम वापर केला गेला, आता विद्यार्थ्यांना नवे वर्ग, नवे बाक एकूणच नव्या शाळेचा अनुभव घेता येणार आहे.