नाशिकमध्ये कोरोनाची चेन ब्रेक कशी होणार? वाढत्या रुग्णसंख्येवर आळा कसा घालणार?
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 12 Apr 2021 12:38 AM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.