Mumbai Unlock : दुकानदारांनी डावी-उजवी बाजू कशी ओळखायची? नव्या नियमांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम
मनश्री पाठकसह वेदांत नेब
Updated at:
01 Jun 2021 10:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील.